Featured

सलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्‍याला सलाम,
न बघणार्‍याला सलाम,
विकत घेणार्‍याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणार्‍याला सलाम,
सलाम, भाई,
सबको सलाम.

Continue reading “सलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)”

Featured

2012 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2012 annual report for this blog.

Here’s an excerpt:

600 people reached the top of Mt. Everest in 2012. This blog got about 12,000 views in 2012. If every person who reached the top of Mt. Everest viewed this blog, it would have taken 20 years to get that many views.

Click here to see the complete report.

Featured

संदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग

टीव्ही पत्रकारिता मॅड सिटी होऊ नये

Featured

महायात्रा : वारी विधानसभेची II

महायात्रा : वारी विधानसभेची हा एबीपी माझाचा खास कार्यक्रम… 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आखण्यात आला होता. महाराष्ट्रातील सर्व सामान्य जननेचं प्रवासाचं साधन असलेल्या एसटी बसमधून सबंध महाराष्ट्र फिरायचा आणि जनतेच्या प्रश्नावर त्यांनी निवडून दिलेल्या किंवा निवडून देणार असलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करायची असा हा कार्यक्रम होता. या प्रकारच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला राज्यातल्या प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे संचलन करणाऱ्या कंडक्टर आणि बसचालकांची नावे घराघरात पोहोचली. तसंच निवडून आल्यानंतर सामान्य उमेदवारही कसा विदेशी बनावटी गाड्यांमधून फिरतो, आणि एसटीमध्ये बसणं हे लोकांच्या प्रतिनिधीला शान के खिलाफ वाटतं, त्याला लोकांच्या एसटीमध्ये बसलेलं पाहायलाही लोकांना आवडलं. त्यानंतर थेट पुढील म्हणजे 2014 च्या निवडणुकीलाच असा कार्यक्रम घेऊन येणं आम्हालाही जरा गैर वाटलं, थेट पाचवर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलो तर आम्ही आणि नेते यांच्यात फरक काय राहिला. म्हणूनच 2009 मध्ये एसटी मध्ये बसलेल्या नेत्यांनी तत्कालीन उमेदवारांनी दिलेल्या आश्वासनांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला आणि 2012 मध्येच महायात्रा काढून विधानसभेवर वारी नेण्याचा निर्णय झाला. पंधरा दिवसात संबंध राज्यातून तब्बल चार हजार किलोमीटर्सचा प्रवास केला. आणि हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी तयार केला. कमी वेळ आणि जास्त अंतरामुळे काही जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व देणं शक्य झालं नाही. त्याबद्धल आमची दिलगिरी… 16 ऑगस्टपासून वारी विधानसभेची प्रसारीत होत आहे, 15 सप्टेंबरला त्याचा शेवटचा भाग प्रसारित झाला… महायात्रा : वारी विधान सर्व व्हिडिओ यूट्यूब प्लेलिस्टवर आहेतच त्याची लिंक

Continue reading “महायात्रा : वारी विधानसभेची II”

Featured

लोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ

तुम्हाला कसलीही व्हिडिओ क्लिप पाहायची असेल तर तुम्ही काय करता. इंटरनेटवर जाऊन सरळ youtube.com असं टाईप करता. आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ पाहता. मग त्यामध्ये अख्खा सिनेमा असो की एखादा एमएमएस. किंवा एखाद्या नव्या, येऊ घातलेल्या सिनेमाचं गाणं किंवा प्रोमो पाहायचा असला तर तुमची पहिली पसंती असते यूट्यूब.

 (कृषिवल, मंगळवार 22 मे 2012) Continue reading “लोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ”

Featured

नापास कोण?

आज बारावीचा निकाल लागलाय. यावर्षी निकाल तसा गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. पण फक्त दोन अडीच टक्क्याने… मार्क्सवादी शिक्षणव्यवस्था आपल्या सगळ्यांचाच खेळखंडोबा करतेय. म्हणूनच मला पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांपेक्षा नापास झालेल्यांचीच जास्त काळजी करावी वाटते. ही एक तीन तासांची परीक्षा त्यांना एवढ्या मोठ्या आयुष्यातून हद्दपार कशी करू शकेल. याच संदर्भात मी गेल्यावर्षी लिहिलेला एक ब्लॉग पुन्हा प्रकाशित करतोय

दहावीचा निकाल लागला. निकालादिवशी मी फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं.

दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन… पास झालेल्यांचे सर्वजण अभिनंदन करतीलच, पण नापासाचं विशेष कौतुक… कारण त्यांनी शाळेला आपल्या शिक्षणात हस्तक्षेप करू दिलेला नाहीय..

यापूर्वी बारावीची परीक्षा झाली तेव्हाही मी असंच फेसबुक स्टेटस अपडेट केलं होतं… ते असं होतं…

बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि न झालेल्याही सर्व विद्यार्थ्याचं अभिनंदन… उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांनी धाडसाने परीक्षा दिली, हे काय कमी आहे… परीक्षेतल्या यशापेक्षा परीक्षा देण्याची मानसिक तयारी जास्त महत्वाची आहे

या दोन्ही स्टेट्सला दहा बारा जणांनी लाईक केलं, काहींना स्टेट्स आवडलं, त्यांनी कॉमेन्ट केल्या… माझ्यासाठी दहावी-बारावीच्या निकालाचा दिवस हा नेहमीच अशा औत्सुक्याचा आणि तणावाचा राहत आलाय. दहावी-बारावी परीक्षा बोर्ड लाखो विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा घेतं… पेनाच्या एका फटकाऱ्यासरशी किंवा कॉम्प्युटरच्या एका क्लिकसरशी या लाखो विद्यार्थ्यांपैकी पास की नापास ठरवून टाकतं.. पुढे त्या विद्यार्थ्याचं काय होतं, कुणालाच त्याचं सोयरसुतक नसतं…

Continue reading “नापास कोण?”

Featured

CHANGE IS GOOD

रामबाण

स्टार माझा चॅनलचं नाव एबीपी माझा असं बदलण्याचा निर्णय पहिल्यांदा कळला तेव्हा फार रुचला नाही.

कोणताही बदल सहजासहजी स्वीकारण्याची मनाची आणि कोणाचीच तयारी नसते हे एक कारण,

तर ‘स्टार’ जाणार आणि त्याची जागा एबीपी अशी अजुन तोंडात न रुळलेली अक्षरं घेणार हे दुसरं.

खरं तर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात -घराघरात मनावर कोरल्या गेलेलं, आपलं वाटणारं ‘स्टार माझा’ हे नाव ज्यावेळी पक्कं झालं त्यावेळीही आम्हा सर्वांना, ‘माझा’ काय चॅनलचं नावंय का? असंच वाटलं होतं. थोड्या फार फरकानं आताही तीच गत आहे. आज एबीपी माझा हे नाव सोशल नेटवर्किंग साईट्सवर गेलं आणि सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे…

ABP म्हणजे काय?

एबीपी म्हणजे आनंद बाजार पत्रिका.

हा भारतातला एक मोठ्ठा वृत्तपत्र समूह आहे. 

साधारण ९० वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये चार पानी सांयदैनिक म्हणून आनंद बाजार पत्रिकेची सुरुवात झाली. २ पैशाला मिळणारं या दैनिकाचा खप होता दररोज १ हजार. आज ९० वर्षांनंतर  आनंद बाजार पत्रिका राज्यात सर्वाधिक खपाचे दैनिक आहे, दररोज ७० लाख वाचकांच्या हातात पोचते.

View original post 344 more words

Featured

गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या समया आहेत,
हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा,
आणि असे इकडे या
पाहिलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तसं नाही,
एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालू आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तूर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असतं,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.

– कुसुमाग्रज

Featured

जेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…

फेसबुकवर टाईमपास करणं तसं आपल्याकडे नवीन नाहीय. फेसबुक आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलंय. कृषिवलच्या मंगळवारसाठीच्या लेखासाठी काही तपशील अभ्यासत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं, तशी बातमी जुनी आहे, मात्र मला मराठी पेपरात कुठे पाहायला मिळाली नाही. कदाचित तुम्हाला माहिती असेल… पण फेसबुकचे विधायक उपयोग किती लोकविलक्षण असू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

{दैनिक कृषिवल (अलिबाग) मंगळवार, दिनांक 20 मार्च 2012}

krushival

Continue reading “जेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…”

Featured

‘जरीला’मधील उतारा…

चांगदेवला अचानक काहीतरी साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं. त्याला वाटलं एकट्या पुरूषाजवळ असून असून किती ओल असणार? आणि असते तीसुद्धा तात्पुरती लंगोट चिकट होण्याइतकी. तरी कुमारपणातही ही ओल आतून धडक मारत असते. ती स्त्रवायला लागली की जगाचा अर्थ बदलतो. — ब्रह्मचर्य म्हणजे रखरखीत वाळवंट, कोरडं रूक्ष. त्यात झरे फुटणं म्हणजे पुन्हा स्त्रीशी संबंध. आपण आता कोरडं खट्ट स्वच्छ घर ठेऊन स्वच्छता राखत असतो ती रोगट आहे. स्त्रीशी संबंध नसल्यामुळे त्या स्वच्छतेला काहीच लोभसपण नाही. आणि हिंदुस्थानसारख्या उष्ण देशात चिरंतन झरणारी ओल आयुष्यात असणं आवश्यक आहे. आणि ती दुसरीकडून कशी आणणार? ती स्त्रीशीच संबंधित आहे. स्त्रीशी किती हजार प्रकारची ओल संबंधित आहे? संसार म्हणजे प्रचंड ओलच, स्वैपाक म्हणजे शिजणारं पाणी, चवदार भाज्या, शिजवलेले वाफ घुटमळणारे ताजे पदार्थ, दूध दही ताक, घुसळणं, आंबवणं, गोडावणं, ओलावणं, खारवणं, तोंडाला सुटणारं पाणी आणि जठरात धावणारे पाचक रस, भांडी घासणं आणि धुणं आणि पुसणं, वाळवणं, ओले हात. संसार म्हणजे कपडे, चिरगुटं धुणं आणि पिळणं, दोरीवर ओळीनं वाळत घातलेली स्वच्छ छोटी छोटी झबली, लंगोट, चड्ड्या, फ्रॉक, ब्रेसिअरी, परकर, ब्लाऊज, बनियन, साड्या, पायजमे, धोतरं आणि त्यांच्यातून टपकणारं स्वच्छ पाणी, थेंब, एकसारखी गोल गोल पुसत आणलेली फरशी, आंघोळी, ओले पाय, न्हाणीघरातून आतपर्यंत उमटलेली लक्ष्मीच्या रांगोळ्यासारखी सुंदर ओली पावलं, ऋतुस्त्राव नेमानं करणाऱ्या रजस्वला, नवविवाहित हट्टी बायकाचं स्फुंदूनस्फुंदून रडणं, आसवं, ओठांवरची रसरशीत ओल, गालांवरची ओल, घरोघर ओल्या गर्भाशयांमध्ये वर्षणारे चपळ ओले रेतसंभार, समागमकारक योनिरस, गर्भाशयात ओल्या पोषक द्रवांमधे तुंडुंब लपेटलेली अर्भकं, जननोन्मुख स्त्राव, लेकरांची दुधानं लाळेनं ओली झालेली झबली आणि डोळ्यांतलं तेजस्वी पाणी, रडणाऱअया पोरांची आसवं, ओली वाहणारी शेंबडी नाकं, लेकरांचं घटकेघटकेला करमणुकीखातर मुतणं, ओले लंगोट, स्तनात दाटलेलं सूक्ष्म छिद्रांतून चुळचुळणारं लेकरांच्या ओठातून वहायला उत्सुक आयाचं दूध.

सगळं आयुष्य ह्या ठिबकणाऱ्या चिकट मऊ पोषक ओलीमधेच वाढत असतं. ही संसाराच्या कृत्रिम भितीतून चाऱ्ही बाजूंनी वहात येणारी विश्वव्यापी ओल आयुष्यात साकळते आणि आयुष्य भिजवून मऊ करून टाकते, कोरडं होऊ देत नाही. हे गुणगुणणारे स्त्रीसिद्ध स्त्राव बेफिकीर तरूणपणाला बेफाम करून मग लोळवतात. सगळं सजीव अस्तित्व म्हणजे एक कोसळणारी प्रचंड ओलच. आतल्या ओलीला वरून ही ओल मिळाली की कोणात तडफड अस्वस्थता रहाणार नाही.

(पद्मश्री भालचंद्र नेमाडे -जरीला- पृष्ठ 195,196) 

Featured

कानामागून आला आणि तिखट झाला…

हे मोबाईल युग आहे, असं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक प्रमुख कालखंडाला त्या त्या काळातल्या प्रमुख घटनेनं ओळखण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालीय. म्हणजे आदीम युग, अश्म युग, लोह युग… असं. हे सर्व आपल्या उत्क्रांतीचे टप्पे… अगदी अर्वाचीन काळापुरतं बोलायचं तर विज्ञान युग, तंत्रज्ञान युग… जाहिरात युग… इंटरनेट युग असं कशालाही तुम्ही युग हा शब्द जोडू शकता. ज्यावेळी जो संदर्भ महत्त्वाचा वाटेल, ते युग तुमच्यासाठी आहे, असं खुशाल समजा… पुन्हा एक सोय अशी की तुम्हाला कोणी असा रेफरन्स दिल्यावर कशावरून हे विज्ञान युग किंवा तंत्रज्ञान युग किंवा जाहिरात युग असं विचारत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या युगाचं असं नामकरण केल्यानंतर त्याचा प्रतिवाद करण्याच्या फारसं कुणी फंदात पडत नाही.

(कृषिवल, मंगळवार, दि. 5 मार्च 2012)

Continue reading “कानामागून आला आणि तिखट झाला…”

Featured

शहरयार… पुन्हा एकदा

जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती हैं हमें... यह जमीं चांद से बेहतर नजर आती हैं हमें..
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है, अब तो हर वक्त यही बात सताती हैं हमे

शहरयार… ते गेल्याची बातमी काल टीव्ही पाहताना समजली. बार्शीत असल्यावर टीव्हीवर बातम्या पाहता येतात.

शहरयार म्हटलं की आठवतं… “गबन”मधली सीने में जलन… ही मायानगरी मुंबईचं सार्थ वर्णन करणारी गजल… आणि उमरावजानच्या सर्वच गझला… उमरावजान अनेकांना लक्षात राहतो रेखाच्या अदाकारीने… पण मला रेखाच्या अदाकारीपेक्षाही शहरयारचे शब्द महत्वाचे वाटतात.

उमराव जान मध्ये प्रत्येकाला भावलेल्या गजला वेगवेगळ्या असतील, पण मला शहरयारचे शब्द आणि त्यांची प्रतिक्षा सर्वाधिक भावते,

मग

इन आंखो की मस्ती के मस्ताने असो की दिल चीज क्या है आप मेरी असू द्या… पण त्यांचा सर्वाधिक अस्वस्थ करणारा प्रश्न म्हणजे “जब भी मिलती हैं मुझे अजनबी लगती क्यों हैं, जिंदगी रोज नये रंग में बदलती क्यों हैं…”   परवाच त्यांना ज्ञानपीठ मिळालं… महानायक अमिताभच्या हस्ते त्यांनी ते स्वीकारलं, त्यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्यानंतर मी हिंदीतले एक महान साहित्यिक कमलेश्वर यांनी शहरयार यांच्यावर लिहिलेल्या एका लेखाचा स्वैर अनुवाद केला होता. त्यातून शहरयार यांना जवळून पाहता आलं. हा अनुवाद माझ्या ब्लॉगवर होताच… पुन्हा एकदा नव्याने कट पेस्ट करतोय एवढंच….

सीने में जलन… आँखो में तुफां सा क्यूं हैं

Continue reading “शहरयार… पुन्हा एकदा”

Featured

फेसबुक : एक यश शेअर आणि कनेक्टचं…

It’s our birthday and we want to thank you for an amazing eight years. You continue to inspire us to provide a service that makes it easy for you to connect with the people and things you care about most.

माझ्या फेसबुक प्रोफाईलवर आलेलं हे फेजबुकचं ताजं स्टेटस… आज म्हणजे शनिवार 4 फेब्रुवारीचं… चार फेब्रुवारी हा फेसबुकचा बर्थ डे… आजचं वय म्हणाल तर फक्त आठ वर्षे… आठवर्षांपूर्वी म्हणजे 2004 मध्ये आजच्याच दिवशी फेसबुकचा जन्म झाला.

(दै. कृषिवल, मंगळवार 07/02/2012)

Continue reading “फेसबुक : एक यश शेअर आणि कनेक्टचं…”

Featured

ट्वीटरची सेन्सॉरशिप!

“The open exchange of information can have a positive global impact … almost every country in the world agrees that freedom of expression is a human right. Many countries also agree that freedom of expression carries with it responsibilities and has limits.”

ही भूमिका आपण आपल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शाळेतच शिकलेलो असतो. म्हणजे भारतात प्रत्येकाला घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार आहे, याचा अर्थ असा नसतो की आपण दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणावी किंवा आपल्या स्वातंत्र्याने एखाद्याच्या भावना दुखावतील किंवा भडकतील… हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जबाबदारीतच अपेक्षित आहे. हीच भूमिका आपण शाळांमधून शिकलेलो असतो. आता ट्वीटरने पुन्हा एकदा याचीच आठवण करून दिलीय.

(कृषिवल, मंगळवार, दिनांक 31 जानेवारी 2012)

Continue reading “ट्वीटरची सेन्सॉरशिप!”

Featured

बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,

एका आवडलेल्या गजलेच्या काही ओळी आहेत… ही गजल गुलाम अली यांनी गायलीय…

बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,
चार किताबें पढ कर वो भी हम जैसे बन जाएंगे..।

बहुतेक निदा फाजली यांची ही गजल असावी… अजून शोध घेतलेला नाहीय. मला नेहमीच असं वाटत आलंय की म्हणजे मी या विचारांचा आहे असं म्हणा.. काहीही चालेल… जगात किंवा आपल्या मानवी आयुष्यात सर्वात अनैसर्गिक बाब कोणती तर ती आहे संस्कार… होय, संस्कार, मला सर्वाधिक अनैसर्गिक बाब वाटते.

Continue reading “बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,”

Featured

एक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा

सोपा आणि पिपा…

हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे…

सोपा म्हणजे SOPA आणि पिपा म्हणजे PIPA. त्याचा विस्तारीत रूप म्हणजे STOP ONLINE PIRACY ACT आणि PROTECT IP म्हणजेच INTELLECTUAL PROPERTY. हे दोन्ही कायदे आनलाईन पायरसी रोखण्यासंदर्भात अमेरिकी संसद म्हणजे काँग्रेसने प्रस्तावित केलेले कायदे आहेत.

आता एक महत्वाचा मुद्दा… हे सर्व हे काही होतंय ते अमेरिकेत, मग आपण त्या निषेधात सहभागी व्हायचं? किंवा आपला म्हणजे एक सर्वसामान्य वेब यूजर किंवा इनमिन इंटरनेटवर एखादा ईमेल आयडी किंवा फक्त फेसबुकवर अकांऊट एवढाच काय तो आपला वेबशी संबंध… बऱ्याचदा आपण ईमेल किंवा फेसबुक चेक करण्यासाठी कधीतरी इंटरनेट कॅफेमध्ये जातो, मग आपल्याला इथे भारतात बसून काय फरक पडणार आहे, कितीही कायदे आले तरी…

(कृषिवल, मंगळवार, दिनांक 24 जानेवारी 2012)
Continue reading “एक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा”

Featured

संतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न!

  • पुण्यात माथेफिरू एसटी बस ड्रायव्हरचा धुमाकूळ
  • स्वारगेट डेपोतून बस ड्रायव्हरने पळविली बस
  • बस थांबवण्यासाठी पोलिसांकडून 10 राऊंड फायर
  • माथेफिरूच्या हैदोसात 9 मृत्युमुखी, 27 जखमी
  • माथेफिरू बस ड्रायव्हरचं नाव संतोष मारूती माने
  • संतोष मारूती माने, मूळचा उत्तर सोलापूर तालुक्याती, स्वारगेट डेपोत नोकरी
  • संतोष माने मनोरूग्ण – मानेचे कुटूंबीय आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर
  • संतोष माने मनोरूग्ण नाही, तो कालपर्यंत एसटीच्या सेवेत होता
  • माथेफिरू संतोष मानेनं मद्यसेवन केलेलं नाही

अशा अनेक बातम्यांची दिवसभर ब्रेकिंग न्यूज सुरू आहे. सकाळी टीव्ही सुरू केल्यावर एवढंच समजलं की कुणीतरी स्वारगेट डेपोतून एसटी बस पळवली आणि पुण्यातील रस्त्यावर सुसाट पळवत नेली. रस्त्यात जो कुणी येईल, त्याला ठोकरत माथेफिरू बसचालक पुढे गेला. बऱ्याचदा तो नो एन्ट्रीतून जात होता. अनेक रिक्षा, टूव्हीलर, छोट्या-मोठ्या कार याचा त्याने चक्काचूर केला. अनेकांना आपल्या बसखाली चिरडलं.

Continue reading “संतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न!”

Featured

सोशल नेटवर्किंगच्या युगात रश्दींना खरोखरच थांबवता येईल?

सलमान रश्दी यांनी जयपूरमधील साहित्य संमेलनात सहभागी होण्याला मुस्लीम मूलतत्ववादी गटांनी विरोध केला. सलमान रश्दी भारतात आले तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे त्यांचा फक्त जयपूरच नाही संपूर्ण भारत दौरा रद्द झाला. पहिल्यांदा त्यांच्या भारतात येण्याला विरोध झाला तेव्हा त्यांनी भारतात येण्यासाठी व्हिसाची गरजच नाही, असंही वक्तव्य केलं होतं. मात्र नंतर त्यांनी आपला दौराच रद्द केला. त्यानंतर आयोजकांनी व्हर्चुअल पद्धतीने म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सलमान रश्दी यांना जयपूर साहित्य संमेलनात सामील करून करून घेण्याचा प्रस्ताव पुढे केला. तर त्यालाही मूलतत्ववाद्यांनी विरोध केला. रश्दींनी भारतात येणं तर दूरच आम्ही स्वतः त्याचं तोंड पाहणार नाही की भारतात कुणाला पाहू देणार नाही, अशी दर्पोक्तीही या आंदोलकांनी केली. आणि आयोजकांनी जर सलमान रश्दी यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दाखवलं तर संमेलनातात हिंसाचार घडवून आणण्याची धमकीही दिली. त्यानंतर अगदी नाईलाजाने आयोजकांना रश्दी याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही रद्द करावं लागलं. त्यानंतर सलमान रश्दी यांनी ट्वीटरवरून व्यक्त केलेलं मनोगत म्हणजे

@SalmanRushdie #JLF Threat of violence by Muslim groups stifled free speech today. In a true democracy all get to speak, not just the ones making threats
@SalmanRushdie #JLF Videolink cancellation: awful

Continue reading “सोशल नेटवर्किंगच्या युगात रश्दींना खरोखरच थांबवता येईल?”

Featured

फक्त दोन वर्षे थांबा! 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल

आता तुमच्यापैकी अनेकांकडे 3G मोबाईल्स असतील. आता यापुढील व्हर्जन कोणतं, असं विचारलं तर साहजिकच तुम्ही म्हणाल की 4G… काही नाही सोप्पंय… प्रत्येकवेळी Gअक्षराच्या मागे एकेक क्रमांक वाढवत न्यायचा. सध्याचा जमाना 3Gचा पण तुम्हाला 2G आणि 1G तरी कुठे माहिती होते. म्हणजे तुम्ही ते वापरत होतातच, पण त्यांना कोणतं जी लावायचं, हे तितकंसं स्पष्टपणे ठाऊक नव्हतं. 2G घोटाळ्याची जेवढी चर्चा झाली, तेवढीही किमान प्रत्यक्षात 2G वापरण्याची झाली नाही. 3G बँडविड्थच्या लिलावा मिळालेल्या प्रतिसादानंतरच आपल्याला 2Gच्या घोटाळ्याची कल्पना आली.
(www.starmajha.com)
Continue reading “फक्त दोन वर्षे थांबा! 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल”

Featured

कॉन्टेन्ट इज किंग!

SOPA आणि PIPA या दोन अँटीपायरसी कायद्यामुळे अमेरिकेतील वातावरण ढवळून निघायलंय. बुधवारी विकीपीडियासह रेडीट, वर्डप्रेस यासारख्या अनेक साईट्सनी आपला निषेध साईट बंद ठेऊन केला. त्यायामुळे या कायद्याच्या विरोधाला एक नवीन आयाम मिळाला. विरोध किती व्यापक आहे आणि कशासाठी आहे. याचीही चर्चा जगभर होतेय. तसं पाहिलं तर हे सर्व प्रकरण अमेरिकेतलं. कायदा करणार अमेरिकेची काँग्रेस. मग आपल्याला काय त्याचं. पण एकदा का अमेरिकेनं असा कायदा केला तर जगातले सर्वच देश असा कायदा करायला सरसावतील. कारण अमेरिकेचं अनुकरण करण्याची एक सवयच आहे.

SOPA आणि PIPA चे समर्थकही मोठे आहेत. थोडक्यात हा वाद हॉलीवूड आणि सिलीकॉन व्हॅली यांच्यातला आहे. म्हणजेच कॉन्टेन्ट क्रिएटर आणि कॉन्टेन्ट डिस्ट्रीब्युटर… यांचातला…

टीव्ही असो की फिल्म किंवा प्रसारणाचं कोणतंही माध्यम… सर्वात महत्वाचा आहे तो कॉन्टेन्ट…. SOPA आणि PIPA यांचा विषय आता सुरू झाला असला तरी कॉन्टेट, त्याचं महत्व आणि डिस्ट्रीब्युशन यांच्यातल्या संबंधांवर न्यूज कॉर्पोरेशनचे प्रमुख रूपर्ट मरडॉक यांनी दोनेक वर्षापूर्वीच एका भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी या भाषणाचं ट्रान्सक्रिप्शन वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशितही झालं होतं. रूपर्ट मरडॉक यांच्या भाषणाचा जमेल तसा अनुवाद करण्याचा प्रयत्न मी दोन वर्षापूर्वी केला होता. जुने मेल चाळताना हा अनुवाद सापडला, स्टार माझा डॉट कॉम वरील ब्लॉगमध्ये दोनवर्षांपूर्वीच हा अनुवाद प्रकाशित झाला होता. सध्या सुरू असलेल्या अँटीपायरसी कायद्याची चर्चा सुरू असताना, त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना, हा अनुवाद पुन्हा एकदा ब्लॉगमधून प्रसारित करण्याचा एक प्रयत्न…
Continue reading “कॉन्टेन्ट इज किंग!”

Featured

माहितीच्या मुक्त प्रवाहासाठी…

आपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे इंटरनेटच्या क्षेत्रातली म्हणजेच ऑनलाईन पायरसीला पूर्णपणे आळा बसेल, असं या कायद्याच्या समर्थकांना वाटतं.
http://starmajha.newsbullet.in/technology/technology/11950-2012-01-17-15-30-10
(स्टार माझा डॉट कॉमवर पूर्वप्रकाशित)
Continue reading “माहितीच्या मुक्त प्रवाहासाठी…”

Featured

इंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल?

मागच्याच आठवड्यात याच स्तंभात लिहिलेल्या लेखात इंटरनेट हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असला तरी मूलभूत मानवाधिकार मात्र नक्कीच नाही, याची चर्चा केली होती. तसं आपल्यापैकी कित्येकांना फेसबुकशिवाय करमत नाही, अशी स्थिती आहे, पण सरकार किंवा न्यायालयीन कारवाईने फेसबुक कधी बंद झालं तर काय… विचार फारसा कुणी करणार नाही, कारण फेसबुक बंद झालं तर अजून दुसरं काही तरी नक्कीच आपल्याला अभिव्यक्त करण्यासाठी उपलब्ध होईल, पण जग आणि संपर्क विज्ञान-तंत्रज्ञान ज्या झपाट्याने बदलतंय, तो झपाटा पाहता खरोखरच फेसबुक बंद करता येईल का?..
(कृषिवल, दिनांक 17 जानेवारी 2012)
Continue reading “इंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल?”

Featured

चित्रे शशिकांत धोत्रे यांची…

चित्रांवर लिहिणं खूप अवघड असलं पाहिजे, किंवा मला ते जमत नसावं, गेले दोन दिवस चित्रांवर लिहिण्याचा प्रयत्न करतोय, पण जमत नाही. अगदी खरं सांगायचं तर मला चित्रातलं फार काही कळत नाही.

तशी चित्रे फक्त आवडतात, बघायला… त्यातलं शास्त्र कळत नाही म्हणजे माध्यम, कागद किंवा कॅनव्हास यातलं काहीच कळत नाही. म्हणजे तुमचं ते मॉडर्न आर्ट वगैरे… किंवा अॅबस्ट्रॅक्ट अशी बरीच काही नावे असतात, जाणकार त्याचं कौतुकही करतात. त्यातून वेगवेगळे अर्थ शोधतात.

फक्त एवढं मात्र नक्की मला माहिती आहे, की चित्र हे सुद्धा एक अभिव्यक्तीचं माध्यम आहे. कविता, कथा, कांदबऱ्या, गेला बाजार फेसबुकवरील स्टेट्स किंवा ट्वीटरवरचे अपडेट्स याप्रमाणे शिल्पकृती किंवा चित्रकृती हेही एक अभिव्यक्तीचं माध्यम… तशी नाटक आणि चित्रपटही किंवा फोटोग्राफी सुद्धा… म्हणजेच कलाकृती कोणतीही असो, ज्याची त्याची अभिव्यक्तीच… एवढं मात्र समजतं. मला वाटतं, तेवढं जरी समजलं तरी पुरेसं आहे, एवढं कळत असूनही पण चित्रावर लिहायला पुरेशी सामुग्री जमत नाहीय.

Continue reading “चित्रे शशिकांत धोत्रे यांची…”

Featured

इंटरनेट : जीवनावश्यक आहे, पण मूलभूत नक्कीच नाही

एक चर्चा सुरू झालीय, पाश्चिमात्य देशांमध्ये… तशी ही चर्चा आपल्याकडे यायला अजून वेळ आहे. इंटरनेटच्या 3G स्पीडमुळे कदाचित सुरू होईलही आपल्याकडे लवकरच….

इंटरनेट हा मानवाधिकार असावा का, म्हणजे मूलभूत मानवी हक्काचा दर्जा देण्याइतपत त्याचं महत्व असावं. तसं पाहिलं तर इंटरनेटचं महत्व आज कुणालाच अनुल्लेखित करता येणार नाही. कारण इंटरनेटची माहिती आणि संदेशवहनाची क्षमता अफाट आहे. त्यात दिवसेंदिवस वाढच होत राहणार आहे.

इंटरनेट आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला असला तरी इंटरनेटने ज्यांच्या कल्पनेतून जन्माला आलं त्यांनीच ही एक नवी चर्चा सुरू केलीय, ती म्हणजे इंटरनेट हा मूलभूत मानवी हक्क असू नये…
(कृषिवल, दिनांक 10 जानेवारी 2012)
Continue reading “इंटरनेट : जीवनावश्यक आहे, पण मूलभूत नक्कीच नाही”

Featured

2011 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2011 annual report for this blog.

Here’s an excerpt:

The concert hall at the Sydney Opera House holds 2,700 people. This blog was viewed about 12,000 times in 2011. If it were a concert at Sydney Opera House, it would take about 4 sold-out performances for that many people to see it.

Click here to see the complete report.

Featured

अण्णा अजूनही लोकांचे हिरो… (स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षण)

2011 या संबंध वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव पडलेला दिसतो. पहिल्यांदा एप्रिलमध्ये जंतर मंतरवर पाच दिवसांचं उपोषण त्यानंतर ऑगस्टमध्ये रामलीला मैदानावर बारा दिवसांचं उपोषण आणि मग वर्ष संपताना मुंबईत एमएमआरडीए मैदानावर दोन दिवसांचं उपोषण…

या तीन उपोषणांपैकी पहिल्या दोन उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, मात्र अण्णांना आपल्या आंदोलनाला असलेला लोकसमर्थनाचा प्रतिसाद तिसऱ्या वेळी म्हणजे मुंबईत कायम ठेवता आला नाही. त्याच पार्श्वभूमीवर स्टार माझा आणि नेल्सनने संयुक्त रित्या देशभरात एक सर्वेक्षण करून अण्णा इफेक्टचा आढावा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. अर्थातच हे सर्वेक्षण प्रातिनिधिक आहे. देशातल्या फक्त 28 शहरांचा त्यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातली म्हणाल तर फक्त पाचच शहरे आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर… अण्णांच्या तीनही आंदोलनानंतर आम्ही देशभरात अशा प्रकारचे सर्वेक्षण केलं होतं. त्या टप्प्यातला हे तिसरं सर्वेक्षण… परवाच ज्येष्ठ राजकीय आणि निवडणूक विश्लेषक योगेन्द्र यादव यांनी एका कार्यक्रमात बोलताना असं स्पष्ट केलं होतं की अण्णा अजूनही या देशातली एक चुकलेला बाण नाही. भलेही त्याचं मुंबईतलं आंदोलन फ्लॉप गेलं असलं तरी अजून त्यांच्यावर देशवासियांचा विश्वास आहे. टीम अण्णांने राजकीय प्रक्रियेला, राजकीय विचारांना सरसकट विरोध न करता भ्रष्ट राजकारणाला विरोध केला पाहिजे… अर्थातच हा विरोध लोकशाही मार्गानेच शक्य होणार आहे, आणि अण्णांना आणि त्यांच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला अपेक्षित असलेले बदल लोकशाही प्रक्रियेतूनच शक्य होणार आहे. कारण अण्णांमध्ये अजूनही लोकांचा विश्वास आहे… तोवर त्यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर कितीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी लोक त्यांच्यासोबतच राहणार आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचं कधीही समर्थन करता येणार नाही. तरीही त्यांनी चालविलेल्या मोहिमेला आपापल्या परीने पाठिंबा तर नक्कीच देता येईल.

Continue reading “अण्णा अजूनही लोकांचे हिरो… (स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षण)”

Featured

2011 : माझं ब्लॉगिंग

https://meghraajpatil.wordpress.com/2011/annual-report/

मित्रांनो, हा काही नवा ब्लॉग नाही… फक्त वर्डप्रेसच्या स्टॅटने पाठवलेली एक लिंक आहे, मी फक्त ती पब्लिश केलीय… फेसबुक आणि स्टीवरवर तर व्यवस्थित पोस्ट झालीय, त्यामध्ये वर्डप्रेसवर शेअर करण्याचाही ऑप्शन होता, पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय…

Featured

वाढत्या लोकांक्षाचं वर्ष 2011

सरलेल्या म्हणजे 2011 या वर्षाच्या गप्पा अजून किती दिवस मारायच्या… आताशा अनेक वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनेलांनी 2011 चा आढावा घेतला असेल, काही अजूनही घेत असतील…
थोडक्यात काय तर …

तुम चले जाओगे तो सोचेंगे…
हम नें क्या खोया, क्या पाया….

(कृषिवल मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2012)
Continue reading “वाढत्या लोकांक्षाचं वर्ष 2011”

Featured

निरोप सरत्या वर्षाला…

Featured

लटकलेलं लोकपाल आणि त्यानंतर…

लोकपाल लटकलं ते लटकलंच… कुणी काहीही म्हणो, पण गुरूवारी मध्यरात्री राज्यसभेत जो काही तमाशा झाला, त्यामुळे सरकार पूर्णपणे उघडं पडलं… आता सरकारचे सर्व वरीष्ठ मंत्री म्हणजे प्रणबदा किंवा पवनकुमार बन्सल किंवा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही नारायण स्वामी यांनी कितीही सांगितलं की आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा लोकपाल सादर करणार, पण त्यावेळी काय होणार, याचा ट्रेलर सबंध देशाने मध्यरात्रीच पाहिला.
Continue reading “लटकलेलं लोकपाल आणि त्यानंतर…”

Featured

सोशल नेटवर्किंगवर निर्बंध घालण्यापूर्वी….

इन बंद कमरों में मेरी सॉंस घुटी जाती है
खिडकियॉं खोलता हूँ तो जहरीली हवा आती है

प्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्वर यांनी आपल्या ‘कितनें पाकिस्तान’ या कादंबरीची सुरुवात या ओळींनी केलीय. या ओळी कुणाच्या याचा उल्लेख त्यांनी त्यामध्ये केलेला नाही. नंतरही माझ्या वाचनात त्या ओळी आलेल्या नाही. आता इथे त्याचा संदर्भ देण्याचा हेतू एवढाच की, सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या संदर्भात आता सुरु असलेल्या काही घडामोडी. यामुळे मला या ओळींचा पुन्हा एकदा शोध घ्यायला भाग पाडलं. मला फेसबुकच्या बाबतीत किंवा त्यासंदर्भात ज्या काही उलट सुलट बातम्या सध्या येत आहेत, त्यावर जे भाष्य करायचंय, ते नेमकं अशा द्विधावस्थेतलं आहे.
(कृषिवल, मंगळवार दिनांक 29 डिसेंबर 2011)
Continue reading “सोशल नेटवर्किंगवर निर्बंध घालण्यापूर्वी….”

Featured

सरत्या वर्षावर छाप अण्णांचीच…

लोकपाल आता दृष्टीक्षेपात आलंय, पण प्रत्यक्षात यायला अजून बराच अवकाश आहे. प्रत्यक्षात येईल की नाही हे अजूनही कुणी ठामपणे सांगत नाही. सरकारने सोमवारी लोकपालवर चर्चा केली. कदाचित आज किंवा उद्या ते संसदेत मांडलंही जाईल. संसद अधिवेशनाचा कालावधी वाढला जाण्याचीही शक्यता आहे. सरकारने फक्त लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यापुरतीच आपली जबाबदारी सीमित असल्याचाही दावा केलाय. म्हणजे लोकपाल विधेयक मांडायचं, त्याचं पुढे काय होईल, ते होईल… तंस गेल्या 40-45 वर्षांपासून ते प्रलंबित आहेच, फक्त महिला आरक्षण विधेयकाएवढी त्याची परवड झालेली नाही, हेच त्यातल्या त्यात एक समाधान…
(कृषिवल, मंगळवार, दिनांक 20 डिसेंबर 2011)
Continue reading “सरत्या वर्षावर छाप अण्णांचीच…”

Featured

माहितीला कुलूप, कल्पनांचा तुरूंगवास

सोशल नेटवर्किंगवरील प्रस्तावित सेन्सॉरशिप सध्या चर्चेचा विषय बनलीय. गेले तब्बल आठवडाभर या विषयावर चर्चितचर्वण सुरू आहे. आतापावेतो वेगवेगळ्या लोकांनी यावर वेगवेगळी मते आणि प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्या डोक्यात ही सुपीक आयडिया पहिल्यांदा आली आणि आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा म्हणून त्यांनी लागलीच ही आयडिया जाहीरही केली. अपेक्षेप्रमाणेच सिब्बल यांच्या या प्रस्तावाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. अजूनही उमटत आहेत. यावरून सरकारला एवढं तरी नक्कीच उमजलं असेल की सोशल नेटवर्किंगवर सेन्सॉरशिप लादणं हे काही तितकंसं सोपं नाही. त्यामुळे एका खूप मोठ्या लोकक्षोभाला तोंड द्यावं लागणार आहे.
(कृषिवल दिनांक 13 डिसेंबर 2011)
Continue reading “माहितीला कुलूप, कल्पनांचा तुरूंगवास”

Featured

लोकलमध्ये भेटलेले प्रा. संदीप देसाई

मला रोज घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास करताना मुंबईच्या तिन्ही लोकल ट्रेनचा वापर करावा लागतो. म्हणजे नेरूळ ते कुर्ला हार्बर, त्यानंतर कुर्ला ते परळ सेंट्रल मेन आणि त्यानंतर एलफिन्स्टन रोड ते महालक्ष्मी असा वेस्टर्न लाईनचा प्रवास…

महालक्ष्मी ते एलफिन्स्टन या प्रवासात ट्रेनमध्ये जागा असली तरी कधी बसण्याचा योग सहसा येत नाही. कारण लोअर परळ हे एक स्टेशन पास झालं की लगेच उतरण्याचे वेध लागतात. कधी कधी जागा असेल तर किंवा मोठ्या मुश्कीलीने मिळाली तर परळ ते कुर्ला दरम्यानच्या प्रवासात कधीतरी बसायला मिळतं. कुर्ला ते नेरूळपर्यंत नेहमीच जागा किंमान उभे राहण्यापुरती तरी मिळावी असं नेहमीच वाटतं पण मिळतेच असं नाही.
Continue reading “लोकलमध्ये भेटलेले प्रा. संदीप देसाई”

Featured

संदीप रामदासींचा ब्लॉग (sandeepramdasi.com)

एफडीआयची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. सरकारने रिटेल म्हणजेच किरकोळ दुकानदारीचं क्षेत्र थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुलं केलंय, तसं हे क्षेत्रं आधीही खुलं होतंच. पण त्यावर मर्यादा होती. सिंगल ब्रँडसाठी आधी ही मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत होती, म्हणजे नोकियासारख्यांना भारतात त्यांची उत्पादने विक्रीसाठी ठेवायची तर त्यासाठी भारतीय उत्पादक शोधावा लागे, आता त्यांची मर्यादा 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलीय. तर मल्टिब्रँडमध्ये पन्नास टक्के थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा घालून देण्यात आलीय.

याला भाजप आणि डाव्या आघाडीसह अनेक विरोधी पक्षांनी विरोध केलाय. एवढंच नाही तर डीएमके आणि तृणमूल यासारख्या सत्ताधारी आघाडीतल्या पक्षांनीही विरोध केलाय. गेले सात दिवस संसदेचं काम चालू दिलं जात नाहीय. सरकारने वेगवेगळे प्रयत्न करून पाहिले. पण काहीच उपयोग होत नाही. अगदी अण्णा हजारेही एफडीआयला विरोध करत आहेत.

मग अशावेळी सध्या देशात असलेल्या म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात किंवा रिटेलमध्येच आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीचे नेमके काय काय तोटे झालेत किंवा फायदे मिळालेत, हेही पाहणं आवश्यक ठरतं… नुसतं साप साप म्हणून भुई थोपटण्यात काहीच हशील नाही…

माझा मित्र संदीप रामदासी यांने आपल्या ब्लॉगवर वॉलमार्टची दुकानदारी या नावाने सध्या वॉलमार्टचं भारतातलं काम कसं चालतं, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय.
Continue reading “संदीप रामदासींचा ब्लॉग (sandeepramdasi.com)”

Featured

व्हाय धिस कोलावेरी डी…..?

व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी? ऐकलंय तुम्ही हे गाणं… सध्या इंटरनेटवर प्रचंड गाजतंय… तसं हे गाणं थोडं तामिळ आहे आणि थोडं इंग्लिश… अगदी स्पष्टपणे सांगायचं तर तिग्लिंश… म्हणजे आपल्याकच्या मिंग्लिश किंवा हिंग्लिश सारखं… कोणत्याही भारतीय भाषेचं इंग्रजीबरोबर फ्यूजन केलं की अशी हायब्रीड भाषा जन्म घेते. आपली बंबईया हिंदीही अशीच मराठी, हिंदी आणि गुजरातीचं फ्यूजन आहे..

Continue reading “व्हाय धिस कोलावेरी डी…..?”

Featured

तुम्हारा आंदोलन, आंदोलन… और हमारा नौंटकी…!

अण्णांच्या कालच्या उतावळेपणाचे पडसाद आजही उमटत आहेत. आज राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये ठाण मांडलंय. त्यांना म्हणे अण्णांच्या वक्तव्याचा निषेध करायचा आहे. मात्र त्यांना आपलं निषेध आणि आत्मक्लेष आंदोलन करू देण्यासाठी अण्णांचे कार्यकर्ते राजी नाहीत. आणि यामुळेच की काय आज राळेगणसिद्धीमध्ये तणाव आहे.
Continue reading “तुम्हारा आंदोलन, आंदोलन… और हमारा नौंटकी…!”

Featured

थप्पड की गूंज… उतावीळ अण्णा आणि सोशल नेटवर्किंग

One may have a problem with politico who’s allegedly corrupt/inefficient, slapping him doesn’t make things right.

आज सकाळी कुणाच्या काही ध्यानी मनी नसताना एक बातमी आली, शरद पवारांना थोबाडीत मारल्याची… दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास… दिल्लीतल्या एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना. कार्यक्रम इफकोचा होता. एनएमडीसी बिल्डिंगमध्ये हा कार्यक्रम होता. तिथे कुणातरी हरविंदर सिंह नावाच्या एका माथेफिरूने शरद पवारांच्या श्रीमुखात भडकवण्याचा प्रयत्न केला. त्याचा संताप अनावर होता. आपल्या संतापाला त्याने फिल्मी स्टाईलने वाट मोकळी करून दिली. खरं तर याच हरविंदरने पाचेक दिवसांपूर्वीच दूरसंचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांच्या कानशिलात लगावण्याचाही प्रयत्न केला होता. यामुळे तो माथेफिरू आहे, हे तर स्पष्टच आहे.
Continue reading “थप्पड की गूंज… उतावीळ अण्णा आणि सोशल नेटवर्किंग”

Featured

सोशल नेटवर्किंग : भान जबाबदारीचं

फेसबुक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तसं ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतंच. फेसबुक म्हणजे सोशल नेटवर्किंग हे तर आता सगळ्या भारत वर्षाला ठाऊक आहे. जगभरात 80 कोटीपेक्षाही जास्त जण फेसबुकवर आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतेच आहे. लवकरच म्हणा किंवा येत्या काही वर्षात भारताच्या लोकसंख्येएवढी फेसबुक प्रोफाईल्सची संख्या असेल.

(कृषिवल, मंगळवार, दिनांक 22/12/2011)
Continue reading “सोशल नेटवर्किंग : भान जबाबदारीचं”

Featured

अंबेजोगाईच्या नेटीझन्सचे विधायक पाऊल

अंबेजोगाईची एक बातमी आहे, तुम्ही जर फेसबुकवर असाल तर तुम्हाला माहितीच असेल, कदाचित. एव्हाना काही वृत्तपत्रांमध्येही येऊन गेली असेल. बातमी तशी साधीच आहे, तसं पाहिलं तर काही वेगळं नाही. फक्त फेसबुकचा वापर किती चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो, याचाच एक नमुना म्हणजे ही बातमी आहे.
(कृषिवल, दिनांक 15/11/2011)

Continue reading “अंबेजोगाईच्या नेटीझन्सचे विधायक पाऊल”

Featured

ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन आणि काही प्रश्न…

ऊस हे राज्यातलं एक पूर्णपणे राजकीय पीक आहे. ऊसाची लागवड करण्यापासून ते कारख्यान्याला नेईपर्यंत सर्व काही राजकारण… दुसरं काहीच नाही. कारखान्याला ऊस घातल्यानंतरही त्यातलं राजकारण संपतच नाही. कारण साखर निर्माण झाल्यानंतरही त्याची विक्री आणि निर्यात वगैरे धोरणातही राजकारण असतंच की.. शिल्लक राहिलेली साखर, त्याची साठवण, खुल्या बाजारातली विक्री, कारखान्याच्या निवडणुका, सभासद, त्याची कर्जे, कार्यक्षमता, सरकारची थकहमी असं सर्व काही राजकारण…
Continue reading “ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन आणि काही प्रश्न…”

Featured

नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण

आज आपल्याकडे ट्वीटरवर असलेले राजकारणी कोण कोणते, तर सर्वात पहिलं नाव येतं, शशी तरूर याचं. पण शशी तरूर हे राजकारणात येण्याआधीपासानूच ट्वीटरवर सक्रीय आहेत, एवढंच नाही तर सध्या त्यांची फॉलोअर्सची संख्या देशात सर्वाधिक आहे. सत्तेच्या राजकारणातून म्हणजे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीपदावरून पायउचार झाल्यानंतरही ते ट्वीटरवर तेवढेच सक्रीय आहेत, जेवढे पूर्वी होते. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही सातत्याने वाढतेच आहे. त्यांनी आपल्या ट्वीटने अनेकदा राष्ट्रीय पातळीवर होडलाईन होतील, अशा बातम्याही दिल्यात. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, भाजपच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज अशी काही मोजकी नावे ट्वीटरवर सक्रीय असलेल्यांची म्हणून घेता येतील. उमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्वीटमधून हेडलाईन्सच्या अनेक बातम्या दिल्या.
(कृषिवल:दिनांक 08/11/2011)
Continue reading “नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण”

Featured

अण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…

अण्णा हजारे यांनी आपला ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट या ब्लॉगसाईटवर असलेला अण्णा हजारे सेज हा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय अण्णांनी आज राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसंच या ब्लॉगवर त्यांचे माजी अधिकृत ब्लॉगर राजू परूळेकर यांनी टाकलेलं पत्र आपली सही नसल्यामुळे अधिकृत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Continue reading “अण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…”

Featured

मुद्दा आहे मराठीचा…..

निवडणूक मग ती मुंबई महापालिकेची असो की बिहारच्या विधानसभेची… मराठीचा मुद्दा कुठेही केव्हाही कॅश होतो. आता राज्यातल्या 196 नगरपालिकांसह फेब्रुवारी मध्ये पंधरा महापालिकांच्या निवडणुका आहेत. शहरी भाग असल्याने मनसे आक्रमक होईल. त्याची नांदी गेल्या काही दिवसात दिसलीय. विहार निवडणुकीच्या काळात जशी राहुल गांधींनी सुरूवात केली तशी आता संजय निरूपम यांनी केलीय, त्यांनी दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांना राज ठाकरेंनी दिवाळीनंतर उत्तर दिलंय. त्यांनी केलेल्या वक्तव्याचं कुणालाही कधीही समर्थन करता येणार नाही.
मुंबई बंद करण्याची धमकी देऊन मराठी माणसांना चिथावणी दिलीत तर राज्यात दंगली पेटतील, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. (बातमी) (स्टार माझातील बातमी) (व्हिडीओ) महाराष्ट्रात दंगली पेटतील की नाही माहिती नाही, पण प्रसार माध्यमे, फेसबुक, वृत्तपत्रे यामधून तर नक्कीच वाक् युद्धाला सुरूवात होईल.

यासर्व घटनाक्रमावर सविस्तर लिहायचं होतंच. त्याचवेळी माझा याच विषयावर एक ब्लॉग सापडला…

हा माझा एक ब्लॉग गेल्यावर्षी किंवा त्यापूर्वी लिहिलेला, नेमकी तारीख आता आठवत नाही. starmajha.com च्या जुन्या साईटवर प्रकाशित केला होता. बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाचा हा ब्लॉग आहे. पुन्हा जशाच्या तसा, मध्ये काही दिवस सध्याच्या ब्लॉगवर हा जुना ब्लॉग मी पेजच्या रूपात टाकला होता. नंतर तो काढून टाकला…. आज पोस्ट म्हणून टाकतोय
*********
Continue reading “मुद्दा आहे मराठीचा…..”

Featured

नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण

Change will not come if we wait for some other person or some other time. We are the ones we’ve been waiting for. We are the change that we seek. – बराक ओबामा

सोशल नेटवर्किंगने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची आजपर्यंतची सर्व परिमाणेच बदलून टाकली. काही मोजक्या लोकांच्या पलिकडे अमेरिकेच्या संबंध जनतेला बराक ओबामा आणि त्याचं जगप्रसिद्ध वाक्य, ज्याला नंतर आपल्याकडे सुभाषिताचा दर्जा मिळाला, Yes We Can! ते फक्त अमेरिकेत नाही तर जगभरात पोहोचलं ते फक्त सोशल नेटवर्किंगमुळेच.
(कृषिवल 1/11/2011)
Continue reading “नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण”

Featured

सबसे बडा रूपय्या!

रूपयाचा नवीन आलेलं नाणं पाहिलंत? स्टीलचं अतिशय लहान… आता पन्नास पैसे किंवा पाच रूपयाचं नाणं असू द्यात, आकारात कसलाच फरक नाही, तेव्हाच पहिल्यांदा पटलं की खरंच रूपया बारीक झालाय…

म्हणजे अगोदर अर्थशास्त्रज्ञ किंवा त्यासंदर्भातले जाणकार कितीही सांगत असले की रूपयाचं मूल्य कमी होतंय, त्यावर सहजासहजी विश्वास बसायचा नाही, पण आताचा रूपया पाहिला की रूपयाचं मूल्य कमी झाल्याची खात्री पटते.

रूपयाच्या नव्या नाण्यात आपण अलीकडेच स्वीकारलेलं रूपयाचं नवं चिन्ह मुद्राकिंत केलेलं आहे, आकाराला अतिशय छोटासा असा हा रूपया..
Continue reading “सबसे बडा रूपय्या!”

Featured

दीपावली शुभेच्छा

माझ्या सर्व वाचकांना, ब्लॉगला फक्त भेट देऊन तो चाळणाऱ्यांना, सर्व मित्रांना, त्यांच्या परिवारांना, कुटुंबीयांना आणि सर्व परिचित तसंच अपरिचितांनाही दीपावलीच्या हार्दिक सुभेच्छा…

दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांनीच दिल्या घेतल्या पाहिजेत, फक्त अट एकच आहे, त्यातली औपचारिकता टाळूयात, जमेल तितकी आणि शक्य होईल तितकं या औपचारिकतेला फाटा देऊयात, कारण आपल्याला कुठलीही निवडणूक लढवायची नाहीय की अन्य कुठेही जाऊन नेतेगिरी करायची नाहीय.

दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या नसल्या तरी त्या असतातच की, मी कुणाला शुभेच्छा दिल्या नाहीत किंवा कुणाकडून स्वीकारल्या नाहीतर तर शुभेच्छा थोड्याच संपणार आहेत… शुभेच्छा विश्वाच्या अंतापर्यंत टिकतील, कारण त्याची ताकद अफाट आहे…

दिवाळी हा प्रकाशाचा, ज्योतीचा, उजेडाचा आणि तेजाचा उत्सव म्हणूनच साजरा व्हायला हवा. हीच फक्त एक माफक अपेक्षा…

शुभेच्छा तर आहेतच, लोभही वृद्धींगत व्हावा…

मेघराज पाटील
themeghraaj@gmail.com

Featured

iSteve: the Book of Jobs च्या निमित्ताने….

स्टीव जॉब्जचं निधन झालं, त्याला आता पंधरवडा उलटून गेलाय. स्टीव जॉब्जच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्याच्या अनेक चाहत्यांनी मधल्या काळात मोठ्या प्रमाणात अॅपल्सच्या प्रॉडक्टची खरेदी केली. आता पुन्हा एकदा स्टीव जॉब्ज चर्चेत आलाय, यावेळी कारण आहे ते त्याच्या चरित्राचं… त्याच्यावरील पुस्तकाचं.
(कृषिवलसाठी लिहिलेला लेख)
Continue reading “iSteve: the Book of Jobs च्या निमित्ताने….”